पुणे महाराष्ट्र

लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज पसरवणं थांबवा; ‘दादां’चा ‘दादां’ना सल्ला

Loading...

पुणे | लोकप्रतिनिधींमध्ये संशयाचे वातावरण तयार करण्याची सवय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटलांना लागली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पुण्यातील बालगधंर्व रंगमंदिरात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. ते राज्य सरकारमध्ये मंत्री असून एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम थांबवावे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

चंद्राकांत पाटलांचं असं वागणं हे त्यांचा स्वभाव असून त्याला औषध नाही, असं म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.

दरम्यान, सरकार चालवणाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून कामे करायची असतात. कामं नाही झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करायची असते. असं म्हणत अजित पवारांनी शिवसेनेलाही धारेवर धरलं.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-बंदूूक घेऊन नाचणाऱ्या भाजप आमदाराला बिग बॉसचं निमंत्रण!

-खासदार अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणतात…

-शिला दीक्षित यांचं जाणं उद्ध्वस्त करणारं; राहुल गांधींना शोक अनावर

-युतीचं राज्य आल्यास मुख्यमंत्री???; आदित्य ठाकरे म्हणतात…

-दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचं निधन

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या