“राज ठाकरेंना एवढं महत्त्व देऊ नका, माझ्याकडे तेवढा वेळ नाही”
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील उत्तर सभेनंतर राज्यात राज ठाकरे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर टीकास्त्र डागलं. याबद्दल बोलताना राज ठाकरेंना एवढं महत्त्व देऊ नका माझ्याकडे तेवढा वेळ नाही, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
आज मी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) भेटायला आलेलो आहे. कुणीतरी काहीतरी बोलतं. तुम्ही त्यांना फार महत्त्व देऊ नका. माझ्या दृष्टीने आज धनंजयची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. माझा सहकारी अॅडमिट आहे. त्याला भेटायला आलो आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंडेंच्या भेटीला पोहोचलेल्या अजित पवारांना राज ठाकरेंच्या टीकेबद्दल विचारणा केली असता मी योग्य वेळी उत्तर देईन, असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“वारसा प्रबोधनकारांचा विचारसरणी मात्र नथुराम गोडसेची”
“जोपर्यंत RCB जिंकत नाही तोपर्यंत लग्नच करणार नाही”
जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर, म्हणाले…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! CNGच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ
मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका, रूग्णालयात दाखल
Comments are closed.