सांगली | आज आबा जरी आमच्यासोबत नसले तरी आबांची पुण्याई आणि जिवाभावाची माणसं आहेत, त्यामुळे तुम्हाला आज घरी बसावं लागलं आहे, असा टोला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना लगावला आहे. आर. आर. आबांना भावांजली वाहण्यासाठी ते तासगावला गेले होते. त्यावेळी पत्रकरांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
सुधीर मुनगंटीवार यांनी कै. आर. आर. पाटील हे हयात नाहीत म्हणून आमचं सरकार आलं, असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.
ताम्रपट घेऊन कोणीच जन्माला येत नसतं. याचं भान मुनगंटीवारांनी ठेवावं. जोपर्यंत आमच्यासोबत बहुमत आहे. तोपर्यंत आमच्या सरकारला धोका नाही, हे भाजप नेत्यांनी चांगल्याप्रकारे समजून घ्यावं, असं म्हणत अजित पवारांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धक्का नाही, त्यामुळं इतर कोणाच्याही वक्तव्याला महत्व देणं गरजेचं नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
शेती करताना तरी इंंदुरीकरांनी कामासाठी येणाऱ्या महिलांशी नीट बोलावं- तृप्ती देसाई
भौतिक सुख वाढलं तरी लोक आंदोलन करत आहेत- मोहन भागवत
महत्वाच्या बातम्या-
चांगलं काम करुनही एवढा त्रास सहन करावा लागत आहे- इंदुरीकर महाराज
“सत्तेसाठी शिवसेनेनं सगळी तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली”
…म्हणून नरेंद्र मोदी माझ्या शपथविधीला गैरहजर राहिले- अरविंद केजरीवाल
Comments are closed.