मुंबई | माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जनतेला किती खोटी आश्वासनं द्याल. रुपयाला चहा तरी भेटतो का?, अशी टीका त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. यावेळी त्यांनी 10 रुपयांत पोटभर जेवण आणि 1 रुपयांत आरोग्य चाचणी अशा घोषणा केल्या आहेत. यावरुन अजित पवारांनी टीका केली आहे. खोटं बोलायची काही सीमा असते, असं त्यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार रूपये देणार असल्याची मोठी घोषणा शिवसेनेने केली आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार म्हणजे देणार, असा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या आश्वासनांची राष्ट्रवादीकडून खिल्ली उडवण्यात आली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला 175 जागा मिळतील, असा विश्वास यावेळी अजित पवारांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या-
“मोदी आमचे वस्ताद अन् आम्ही त्यांचे चेले; मैदान कसं मारायचं आम्हाला माहितीये” https://t.co/ILPQYv7KPR @Dev_Fadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) October 14, 2019
नितेश आणि निलेश राणेंमध्ये मतभेद आहेत का?; निलेश राणे म्हणतात… https://t.co/pNljIC2GmA
— थोडक्यात (@thodkyaat) October 14, 2019
…तर आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री व्हावं- देवेंद्र फडणवीस- https://t.co/yMZ2zPuHC6 @Dev_Fadnavis @AUThackeray @BJP4Maharashtra @ShivSena
— थोडक्यात (@thodkyaat) October 14, 2019