बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर ते पाप फडणवीस सरकारचं- अजित पवार

मुंबई |  राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप शिवसेनेवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला चांगलंच सुनावलं आहे.

दुष्काळग्रस्त बळीराजाला कर्जामाफी तर सोडाच परंतू पुनर्गठीत कर्जावर 10 ते 12 टक्के व्याज आकारून सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर ते पाप फडणवीस सरकारचं असेल, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली आहे.

सहा महिन्यांपूर्वी 191 तालुके दुष्काऴग्रस्त होते पण सरकारने चारा छावण्या एप्रिलमध्ये सुरू केल्या, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

दरम्यान, सत्ताधारी भाजप शिवसेनाला कोंडीत पकडण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पूरेपूर प्रयत्न करेल मात्र विखेंच्या भाजपात जाण्याने आणि धनंजय मुंडेंच्या जमीन हस्तांतरण प्रकरणाने तितकीशी धार नसेल, असं बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या

-मनसेची राधाकृष्ण विखेंवर बोचरी टीका; ‘स्वार्थही ओशाळला असेल’…

-मंदिरात चोरी केल्याच्या संशयावरुन चिमुकल्याला गरम टाईल्सवर बसवलं

-पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकूनही भारतीय संघाचं टेंशन वाढलं

-रोहित शर्मानं आपल्या धडाकेबाज शतकाचं श्रेय दिलं समायराला!

-भारताने पाकिस्तानवर केला दुसरा स्ट्राईक- गृहमंत्री अमित शहा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More