“जे बाळासाहेबांचं स्मारक बांधू शकले नाहीत ते राम मंदिर काय बांधणार”??

नवी मुंबई |  जे बाळासाहेबांचं स्मारक बांधू शकले नाहीत ते राम मंदिर काय बांधणार? असा पुनरूच्चार करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

ज्यांच्या हाती गेली 23 वर्षे बेस्टचा कारभार आहे ते बेस्ट कर्मचाऱ्यांना समाधानी करू शकत नाहीत ते राज्याला काय देणार, अशा शेलक्या शब्दात त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

भाजपच्या कारभारात शिवसेनासुद्धा तितकीच पापाची भागिदार आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या परिवर्तन मेळाव्यात अजित पवार शिवसेना-भाजपवर चांगलेच तुटून पडले होते.

महत्वाच्या बातम्या-

-उत्तर प्रदेशमध्ये भाजपची चिंता वाढणार?; भीम आर्मीचा पाठींबा सपा,बसपाला

-अजय देवगणच्या नव्या लूकने आठवण करुन दिली ‘राजा रॅन्चो’ची

-भाजपकडून कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ सुरु- डी.के.शिवकुमार

-“साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच, कार्यकर्त्यांनो तयारीला लागा”!

-…तर लोकसभेसाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार- शिवपाल यादव

Google+ Linkedin