बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे लोकशाहीत चालतं का?’, अजित पवारांनी राज्यपालांना सुनावलं

मुंबई | लोकशाहीत राज्यपाल या घटनात्मक पदाला फार महत्त्व आहे. पण कधीकधी राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात कलगीतूरा देखील रंगू शकतो. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या काही निर्णयामुळं महाविकास आघाडीची कोंडी झाली होती. आता ठाकरे सरकार राज्यपालांच्या अधिकारामध्ये कपात करत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

ठाकरे सरकारनं विद्यापीठ कायद्यामध्ये दुरूस्ती करताना कुलगुरू नियुक्तीच्या अधिकारात बदल केले आहेत. आता राज्य सरकार जी नावं राज्यपालांना पाठवणार आहे त्यातून एकाची कुलगुरू म्हणून राज्यपाल नियुक्ती करू शकतात. यावर अजित पवार यांनी सरकार कोणतंही राजकारण करत नसल्याचं म्हटलं आहे. सरकार राज्यपालांच्या अधिकारात कपात करत नाही, असं अजित पवार स्पष्टपणे म्हणाले आहेत.

कुलगुरू निवडीसाठी एक समिती काम करते ती समिती सरकारला पाच-सात नावं पाठवेल त्यातून आम्ही राज्यपालांना दोन नावं पाठवणार आहोत. यात कसलं आलं राजकारण उगाच काही लोकांना आरोपांशिवाय काही राहीलंच नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. राज्यपाल जेव्हा 170 आमदारांचा पाठिंबा असून 12 आमदारांच्या नावांना मंजुरी देत नाहीत हे लोकशाहीत चालतं का?, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यात राज्यपाल विरूद्ध सरकार हा सामना अनेकदा रंगलेला पाहीला आहे. भगतसिंग कोश्यारी हे प्रतिसरकार चालवत आहेत, अशी टीका सुद्धा त्यांच्यावर झाली होती. आता तर ठाकरे सरकारनं त्यांच्या अधिकारात कपात केल्यानं राज्यात राजकारण तापलेलं आहे.

थोडक्यात बातम्या 

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“राज साहेब माझं काय चुकलं?”, पुण्यापाठोपाठ औरंगाबाद मनसेमधील अस्वस्थता उघड

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवली

अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा’; इंद्राणी मुखर्जींच्या दाव्याने देश हादरलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More