‘हिंमत असेल तर…’; अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज
मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार बोलणं टाळलं. मात्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली होती, त्याला अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
सरकार कुठेतरी आपल्याच आमदारांना मंत्र्यांना घाबरलं आहे, त्यामुळे येत्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दाच कार्यक्रम पत्रिकेत घेण्यात आला नाही. यावर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. याला उत्तर देत अजित पवारांनी हिंमत असेल तर महाविकास आघाडीवर अविश्वास ठराव आणून दाखवावा, असं आव्हान दिलं आहे.
जर त्यांना तसं वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव दाखल करावा. वाजवून दाखवतो की किती आमदार आमच्या सोबत आहेत आणि किती त्यांच्यासोबत, असं म्हणत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज दिलंय.
दरम्यान, न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र तसा होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिलाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘बिग बी’ यांच्या प्रकृतीत बिघाड स्वत: पोस्ट करत दिली माहिती
सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी
बॉसशी बोलला खोटं, प्रकरण झालं मोठं; सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं दिलं ‘हेे’ धक्कादायक कारण!
सलमानच्या ‘त्या’ एक्सगर्लफ्रेंडवर झाला होता बलात्कार, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी ओलांडली आता…- पंकजा मुंडे
Comments are closed.