मुंबई | केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा या अर्थसंकल्पात कायम आहे. महिलांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव काहीही दिसत नाही, असं अजित पवारांनी म्हटलंय.
पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ असल्याने केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पश्चिम बंगालला 25 हजार कोटी जाहीर केले, ते मिळतील याची खात्री नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अर्थसंकल्पात यावेळीही अन्याय झाला आहे. महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
आत्मनिर्भर भारत म्हणून सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात…- अमोल कोल्हे
‘…असा विचार करणं कितपत योग्य आहे?’; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका
सरकारचा कंपन्यांना दिलासा; पीएफसंदर्भात निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा
“निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजप निवडणूकीचा जाहीरनामा”
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण निश्चित