बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे- अजित पवार

पंढरपूर | चंद्रकांत पाटील  हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे. त्यांना कोणतीही संस्था किंवा साधी सोसायटी चालवण्याचाही अनुभव नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. ते पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या शिवाजी चौकातील प्रचारसभेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी कधी कुठलीही संस्था काढलेली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना चालवलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही. टरबूज-खरबुज सोसायटी कधी काढली नाही. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांशी काहीही देणघेणं नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाचा झंझावात आल्यामुळे त्यांना लॉटरी लागलेली आहे, असं म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’ या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचलं आहे. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. ते टिकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीकास्त्र सोडलंय. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणं कोणा येड्या गबाळ्याचं काम नाही, अशी बोचरी टीका अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय”

पुणे हादरलं! निवृत्त पोलीस अन् गुन्हेगारात वाद झाल्यानंतर गुन्हेगाराचा विचित्र मृत्यू

संजय राऊतांनंतर राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर बेळगावात, मराठी माणसाचा प्रचार करणार!

“ज्यांनी भांडणं लावून लोकांची घरं फोडली, त्यांच्या घरात आता टोकाची भाडणं”

भावोजींच्या प्रेमापोटी मेहुणीनं आपल्या पतीसोबत केलं हे धक्कादायक कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More