दिल्लीत दोन दिवसांपासून अजित पवार वेटिंगवर; अमित शाहांकडे ‘या’ मागण्या करणार?

Ajit Pawar | महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबतचा निर्णय आज (4 डिसेंबर) होणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 10 वाजता मुंबईत बैठक होणार असून या बैठकीत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा फडणवीस यांची वर्णी लागणार असल्याचे यातून निश्चित झालं आहे. (Ajit Pawar) 

दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपमध्ये अजूनही गृहमंत्री पदावरून पेज कायम असल्याचं बोललं जातंय. त्यातच अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. आपल्या पदरात चांगली खाती पडावी यासाठी अजित पवार दिल्लीला गेले असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांची अजूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट झालेली नाही.

अजित पवारांच्या मागण्या कोणत्या?

अर्थमंत्री राष्ट्रवादीकडेच राहावं, मंत्रिमंडळात 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदासाठी अजित पवार आग्रही आहेत. तसेच केंद्रात एक कॅबिनेट आणि एका राज्यपाल पदाची देखील अजित पवारांनी मागणी केल्याची माहिती आहे. आता यापैकी कोणत्या मागण्या पूर्ण होणार याकडे सर्वांचंच लक्ष राहणार आहे. तसंच आज तरी अमित शाह ( Amit Shah) आणि अजित पवार यांची भेट होणार का? याकडेही सर्वांची नजर असेल. (Ajit Pawar)

दरम्यान, भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर आज महायुतीचे तिन्ही नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. सरकार स्थापनेचे पत्र ते राज्यपालांकडे आज सोपवणार आहेत. तर भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारामन हे दोन्ही नेते मुंबईत दाखल झाले आहेत. हे दोन्ही निरीक्षक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेतील.

उद्या शपथविधी सोहळा पार पडणार

मुंबईच्या आझाद मैदानात 5 नोव्हेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आलाय. येथे जवळपास अडीच हजार हून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. शपथविधी दरम्यान 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. (Ajit Pawar)

याचबरोबर सशस्र पोलीस दल,  टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

News Title – Ajit Pawar demand regarding mahayuti cabinet

महत्त्वाच्या बातम्या : 

आज देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशींच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार!

“आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व…”, सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत

पहिल्या टर्मला आमदारकी अन् दुसऱ्या टर्मला थेट मंत्रिपद, अजित पवारांकडून ‘या’ नेत्याला बक्षीस मिळणार?

मोठी बातमी! शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?; संभाव्य यादी जाहीर

“….तर एकनाथ शिंदे हे ठाकरेंना सोडून गेले नसते”, भाजपच्या नेत्याचं मोठं विधान