बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवार आणि अशोक चव्हाणांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”

सातारा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधित व्यक्ती आणि काही साखर कारखान्यावर अलिकडेच आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली होती. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा देखील समावेश होता. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षा आणि माजी आमदार डॉ.शालिनी पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.

मंत्रिपदाचा आणि राज्य सहकारी बॅंकेच्या सत्तेचा गैरवापर करून अजित पवार आणि अशोक चव्हाण यासारख्या अनेक मंत्र्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने घेतले. त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. अजित पवार यांनी सत्तेचा दुरूपयोग करून जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कमी किंमतीत बेकायदेशीर लिलावात विकत घेऊन कोरेगाव-खटाव तालुक्यातील हजारो उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचाही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे.

उच्च न्यायलायाने अजित पवार यांची फसवणूक उघडकीस आणली आणि साखर कारखान्याच्या विद्यमान खासगी संचालकांच्यावर गुन्हे दाखल केले. आज आयकर विभागाने साखर कारखाना जप्त केला. कायदेशीर कारवाई आणि चौकशी आयकर विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची शिफारस राज्यपालांनी राज्य शासनाकडे करावी अशी मागणी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, असंही शालिनी पाटील म्हणाल्या.

दरम्यान, अलिकडेच अजित पवार यांच्या  तिन्ही बहिणींच्या घरावर देखील आयकर विभागाने चौकशी केली होती. तसेच त्यांच्या संबंधित साखर कारखान्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर आयकर विभागाने त्या साखर कारखान्यांशी चौकशी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान मोदींनी लवकरात लवकर गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करावं”

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

“यंदा दिवाळीला भाऊबीज म्हणून गॅस सिलेंडर मागणार”

“नवाब मलिक म्हणजे बिघडे नवाब, माझ्या अंगावर कोणी आलं तर…”

याला म्हणतात झटपट निकाल! कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने घेतले शिंगावर; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More