अजित पवार कॅप्टन कोहली तर धनंजय मुंडे हरभजन सिंग!

राहुरी | आज विराट कोहलीनंतर हरभजन फलंदाजीला आला आहे, मात्र कधीकधी हरभजनही सामना जिंकून देतो, तू बिनधास्त बॅटिंग कर, असं अजित पवार यांनी धनंजय मुडेंना म्हटलं. राहुरीतील हल्लाबोल सभेत हा प्रकार घडला. 

राष्ट्रवादीच्या युवकांनी काढलेल्या बाईक रॅलीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते, त्यामुळे ते सभेला उशिरा पोहोचले. त्यावेळी अजित पवार यांचं भाषण सुरु  होतं. मात्र त्यांच्या भाषणानंतर धनंजय मुंडेंनी बोलावं, असा आग्रह उपस्थितांनी धरला. पक्षशिस्तीला धरुन नसल्याने धनंजय मुंडेंनी नकार दिला, मात्र अजित पवारांनी त्यांना परवानगी दिली. 

खूप अवघडल्यासारखे वाटते, दादा तुम्ही परवानगी दिली हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही आदेश दिला आहे आणि मी आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे म्हणून बोलतो, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.