जनतेचा कौल 5 महिन्यांत बदलला, आम्ही काय करणार?

Ajit Pawar

Ajit Pawar l राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून कोणत्या या कोणत्या कारणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अशातच आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरु केलं आहे. मात्र या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यातील दिग्गज राजकीय पदाधिकारी भेट देत आहे. तसेच आज अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आहेत. तसेच यावेळी अजित पवारांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनातील सर्व मुद्दे खोडून काढली आहेत.

अजित पवार काय म्हणाले :

अजित पवार यावेळी म्हणाले की, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी मांडलेल्या भूमिकेतील काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. तसेच काही मुद्दे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित असल्याचं दिसत आहे. यावेळी आम्ही निवडणूक आयोगाला लक्षात आणून दिलेली मुद्दे त्यांनी मान्य देखील केले होते.

याशिवाय लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यावेळी आम्ही ईव्हीएमबाबत बोललो देखील नाही. तसेच विधानसभेत आम्हाला यश मिळाल्यावर हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच अजितदादा यांनी पाच महिन्यांतील बदलाबद्दल बारामतीचे उदाहरण देखील दिले आहे.

Ajit Pawar l पाच महिन्यांत इतक कसा? :

यावेळी अजितदादा म्हणाले, बारामतीमध्ये लोकसभेत सुप्रिया सुळेंना मतदान झाले. मात्र आता विधानसभेत मला मतदान दिले आहे. तसेच जनतेने आधीच म्हटले होते की, लोकसभेत ताईंना तर विधानसभेत दादांना. त्यानुसार राज्यभरात देखील झालं आहे. त्यामुळे लोकसभेत महाविकास आघाडीला आणि विधानसभेत महायुतीला मतदान केले आहे.

तसेच राज्यातील जनतेचा कौल हा पाच महिन्यांत बदलला त्याला आम्ही काय करणार? असा प्रश्न अजित पवार यांनी बाबा आढाव यांना विचारला आहे. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी लोकसभेनंतर पाच महिन्यांत इतक कसा बदल होऊ शकतो? असा प्रश्न देखील उपस्थित केला होता.

News Title :  Ajit Pawar direct question to Baba Adhaav

महत्वाच्या बातम्या –

आयकर विभागाची मोठी कारवाई, डोळे फिरवणारी रोकड लागली हाताला

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख व ठिकाण ठरलं; कधी होणार?

राज्यातील 22 उमेदवारांचा ईव्हीएमवर संशय; फेर मतमोजणी होणार?

आज शनि अमावस्येला घरात सुख-समृद्धीसाठी ‘हे’ उपाय करा!

सर्वात मोठी बातमी! राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .