बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवारांकडे 10 सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही”

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी बीड दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी सेवेत सामावून घेण्याचं निवेदन देण्यासाठी वेळ न दिल्यानं कोरोना काळातील कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांनी संतप्त होऊन अजित पवारांच्या गाडीसमोर आंदोलन करायला सुरूवात केली. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीसांकडून त्या कर्मचाऱ्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. त्यावेळी दोन महिला जखमी झाल्या आहेत. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. अजित पवारांनी ‘Guard of honour’ पावसामुळे नाकारला म्हणून त्यांचं काही मीडीयावाले कौतुक करतायत पण अजित पवारांकडे 10 सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नसल्याचं, निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बीड मधे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आरोग्य कर्मचारी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना काय वागणूक मिळाली बघा, असं म्हणत निलेश राणे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला अजित पवारांच्या गाडी समोर जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

पोलीसांचा बंदोबस्त असल्यामुळे त्या महिलांना अडवण्यात येत आहे. त्यावेळी त्यातील काही महिला जखमी झाल्या असल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यावरून निलेश राणेंनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.

थोडक्यात बातम्या-

राहुल गांधी प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व, त्यांचं स्वप्न साकार होवो- संजय राऊत

“कोरोनाची तिसरी लाट पुढील 6 ते 8 आठवड्यात येण्याची शक्यता”

“बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न शिवसेनेनं पूर्ण केलं; त्यांच्याच विचारधारेवर शिवसेना पुढे जातीये”

“राणे नावाने शिवसेना घाबरते, पुन्हा समोर आल्यास जोरदार उत्तर द्या”

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या- प्रविण दरेकर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More