निकालानंतर ‘या’ मोठ्या पदावर अजित पवारांची नियुक्ती!

Ajit-Pawar-

Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नव्हेंबर रोजी जनतेसमोर आला. महाराष्ट्रात महायुतीने पुन्हा एकदा कमबॅक केलं. यावेळी महाविकास आघाडीला मात्र धक्का बसल्याचं चित्र पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे नेते मंत्री मात्र जल्लोष साजरा करताना दिसत आहेत.

अजित पवारांना कोणतं पद?

निकाल स्पष्ट झाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाबाबत माहिती दिली. सोमवारी वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर, आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे.

देवगिरी बंगल्यावर बैठक-

काही वेळा पूर्वी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांच्या उपस्थितीत एकमताने अजित पवार (Ajit Pawar) यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभेमघ्ये देखील बहुमत सिद्ध करण्यासाठी बहुमत चाचणी होईल. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना महत्त्व प्राप्त होतंय. काल निकाल लागला आणि महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला. यावेळी महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत.

News Title : ajit pawar elected as leader of legislative assembly

महत्त्वाच्या बातम्या-

निकालानंतर EVM विरोधात याचिका कोण दाखल करणार?

जरांगे फॅक्टरचा फायदा कुणाला?, सर्वाधिक मराठा आमदार कोणत्या पक्षाचे आले?

“त्या गरजा माझ्या खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

बच्चू कडूंना पराभवाचा जोरदार धक्का, म्हणाले मी…

मोठी बातमी! औक्षण करताना उडाला भडका, नवनिर्वाचित आमदार जखमी

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .