अपघातानंतर पोलिस आयुक्तांना फोन केला होता का?; अजित पवारांचा मोठा खुलासा

pune porsche accident | पुण्यात 19 मे रोजी झालेल्या अपघात प्रकरणामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने नशेत कार चालवत दोघांना उडवलं. या घटनेमध्ये तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे. त्यात अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचा समावेश आहे. आता त्या मुलाची आई शिवाणी अग्रवाल हिला शनिवारी अटक झाली. या प्रकरणात रोज अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

अजित पवारांचं स्पष्टीकरण

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव अडचणीत सापडलं आहे. त्यामुळे अशात अजित पवार यांच्या भूमिकेसंदर्भातही अनेक सवाल केले गेले. अपघात झाला त्या रात्री आमदार टिंगरे पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता का?, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवरच आता स्वतः अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज (1 जून) माध्यमांसोबत संवाद साधताना अजित पवारांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. राज्यात सर्वत्र त्या भागातील आमदार एखादी घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात जात असतात. तो त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना योग्य चौकशी करण्याचा (pune porsche accident) सूचना देतो. त्यानुसार आमदार सुनील टिंगरे गेले होते. त्यांनी कोणताही दबाव आणला नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अपघात प्रकरणावर अजित पवारांनी मांडली भूमिका

“आता हे प्रकरण जनतेचं झालं आहे. या प्रकरणात चौकशी पारदर्शकपणे करा. कोणाच्या दबावास बळी पडू नका, इतक्याच सूचना आम्ही अधिकाऱ्यांना करत आहे”, असं अजित पवार म्हणाले. तसंच अपघातानंतर पोलीस आयुक्तांना आपण फोन केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात फोन केला असता तरी जखमींना मदत तातडीने द्या आणि आरोपींवर कारवाई करा अशाच सूचना आम्ही देत असतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.

यावेळी अजित पवार यांनी डॉ. अजय तवारे यांच्या शिफारस पत्राबाबतही भाष्य केलं. बदलीची शिफारस आम्ही करतो. परंतु ते नियमात आहे की नाही, हे बघण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. आमचे (pune porsche accident ) शिफारस पत्र असते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नियम पाहून बदली करायला हवी, असं अजित पवार म्हणाले आहेत.

News Title –  Ajit Pawar explanation on Pune Porsche Accident case

महत्वाच्या बातम्या-

तुम्हाला माहितीये का? 1 जूनला सरकारी बड्डे का असतो?

4 जूनला कुणाचं सरकार येणार?; सट्टा बाजाराची भविष्यवाणी आली समोर

मान्सूनची दणक्यात एंट्री; पुढील दोन दिवस ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, अलर्ट जारी

आनंदाची बातमी! केंद्र सरकारने ग्रॅच्युइटी रकमेत केली मोठी वाढ

महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी; गॅस सिलिंडरचे दर ‘तब्बल’ इतक्या रुपयांनी झाले स्वस्त