मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्याकडून आईला बेदम मारहाण

Ajit Pawar Faction Leader Beats Mother in Maval

Ajit Pawar Faction | पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अजित पवार गटाचा नेता मारुती देशमुख याने आपल्याच जन्मदात्या आईला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मारुती देशमुख आणि त्याच्या पत्नीने मिळून मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. (Ajit Pawar Faction)

“माझ्या मुलाने मला लाकडी दांड्याने मारहाण केली,” असा आरोप मारुती देशमुखच्या आईने केला आहे. माध्यमांसमोर येऊन त्यांनी आपल्या अंगावर मारहाण झाल्याचे व्रणही दाखवले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाऊ राजेंद्र देशमुखकडून गुन्हा दाखल

मारुती देशमुख हा अजित पवार गटाचा मावळ तालुका ओबीसी सेलचा (OBC Cell) अध्यक्ष आहे. मारहाणीनंतर आरोपीचा लहान भाऊ राजेंद्र देशमुख याने मारुतीविरोधात गुन्हा दाखल केला. मारुती देशमुखने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. “आपण आईला मारहाण केली नाही. मला अजित पवार गटाकडून पद मिळाल्यामुळे माझी बदनामी सुरू आहे,” असा दावा त्याने केला होता.

आरोपीच्या आईने माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आणि मुलाचे पितळ उघडं पाडले. “मारुती देशमुख आणि त्याच्या बायकोने मला मारहाण केली. लाकडी दांड्याने माझ्या पाठीत मारलं. या आधीही त्याने आणि त्याच्या बायकोने मला मारहाण केली आहे. फक्त मुलाची बदनामी होऊ नये, म्हणून मी काहीही बोलली नाही,” असे त्या म्हणाल्या.

मानसिक आणि शारीरिक छळ

“पोटच्या मुलाची अब्रू वाचवण्यासाठी मी मूळगावी आले, पण मुलाने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला,” असा आरोपही आईने केला आहे. तसेच, या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केल्याची माहितीही त्यांनी दिली.

मारुती देशमुख हा कार्ला येथील आई एकविरा देवी ट्रस्टचा (Aai Ekvira Devi Trust) उपाध्यक्षही आहे. त्यानेच स्वतःच्या आईवर अन्याय करत तिला मारहाण केल्याने त्याच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. आरोपीचे भाऊ राजेंद्र देशमुख यांनी अजित पवारांनी आरोपी भावावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (Ajit Pawar Faction)

Title : Ajit Pawar Faction Leader Beats Mother in Maval

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .