बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कारखान्यावरील धाडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | अजित पवारांशी संबंधित असलेल्या विविध कारखान्यांवर व त्यांच्या स्वकीयांच्या संस्थांवर आज सकाळपासूनच आयकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच कारखान्यांच्या संचालकांच्या घरीही धाडी टाकल्या आहेत. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्यांशी संबंधित संस्थांवर आणि कारखान्यावर कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर बोलताना ‘आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे, शंका आल्यास ते छापेमारी करू शकतात’ असं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच भाजपशी संबंधित असलेल्या एकाही कारखान्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, असं देखील त्यांनी नमुद केलं.

‘मी अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची आणि कुठला कर कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे, माझ्या कंपन्यांचा कर वेळच्या वेळेला भरला जातो, तरीही राजकीय हेतूने ही धाड टाकली की, आणखी काही माहिती हवी होती हे आयकर विभागच सांगू शकेल, फक्त माझ्या बहिणी आहेत म्हणुन होत असलेली कारवाई वाईट आहे’, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप यंत्रणांचा वापर करून घेत असल्याचा आरोप करत अजित पवारांकडे लपवण्यासारखं काहीच नाही, अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांची पाठराखण केली आहे. आता खुद्द अजित पवारांनीच माध्यमांसमोर येऊन आपली बाजू स्पष्ट केल्याने अनेक तर्क वितर्कांना विराम बसला आहे. तसेच या कारवाईत नेमकं काय साध्य होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या

आरोग्यमंत्र्यांनी केली नवीन योजनेची घोषणा, काय आहे ‘मिशन कवच कुंडल’?

आयकर विभागाच्या छाप्यानंतर जयंत पाटलांनी केली अजित पवारांची पाठराखण, म्हणाले…

आर्यन खानसोबत दिसलेल्या ‘या’ भाजप नेत्याचं स्पष्टीकरण, म्हणाले…

…म्हणून स्वप्निल जोशी म्हणतो; आम्हा कलाकारांना अकला नाहीत!

मोठी बातमी! पवारांशी संबंधित कारखाने आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More