Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या महायुतीत आहेत. त्यांना बाहेर काढा. अजित पवार जर सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको, असं एका भाजप कार्यकर्त्याने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासमोर म्हटलंय. अजित पवार (Ajit Pawar) हे पुण्याचे पालकमंत्री आमच्या बोकांडी बसलेत, असं म्हणत भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यासमोर खदखद व्यक्त केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा”
भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) सुनावलं ते म्हणाले की, अजित पवारांना (Ajit Pawar) महायुतीतून बाहेर काढा असे प्रत्येक कार्यकर्त्याचं मत आहे. याला तुम्ही सल्ला समजलात तरी चालेल. अजित पवारांना सुभाष बापू , राहुल कुल आणि योगेश अण्णांवर अन्याय केला आहे. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळालं असतं.
अजितदादांकडे आमचे बाबासाहेब आणि श्याम गावडे निधी मागायला गेले तर अजितदादा म्हणाले तुमचा संबंध काय? आम्ही 10 टक्केच निधी देणार अरे नको आम्हाला अशी सत्ता.., असं सुदर्शन चौधरी म्हणाले आहेत.
“तेच आमच्या बोकांडी बसले”
अजित पवार हे सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. त्यांनी कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची अशीच परिस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्याला कायमचा बाहेरचा पालकमंत्री मिळाला. पुणे जिल्ह्यातील लोकांचे हाल झाले आहे.
ज्या राष्ट्रवादीचा 10 वर्षे आम्ही विरोध करतोय तीच राष्ट्रवादी तुम्ही आमच्या बोकांडी आणून ठेवलं. अक्षरश: भीतीच्या वातावरणात आहे. अजित पवारांना कशासाठी सत्तेत घेतलं? असा सवाल त्यांनी केला आहे.
अजित पवारांना पालकमंत्री व्हायचं, तिथे त्यांनी बॉस व्हायचं आणि आदेश द्यायचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचं. नको आम्हाला अशी सत्ता…, अशी भावना सुदर्शन यांनी व्यक्त केली आहे.
News Title – Ajit Pawar Get Out From Mahayuti BJP Workers Demand At MLA Rahul Kul
महत्त्वाच्या बातम्या
“मागून येणाऱ्यांना अगोदर संधी मिळते हे वाईट”; एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
पुण्याहून कोकणभागात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!
फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये, नेमकी काय चर्चा झाली?
करिना कपूरच्या सासूने केला मोठा खुलासा!
“राम मंदिराला गळती, पेपरला गळती..”; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे कडाडले