Top News महाराष्ट्र मुंबई

“अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावलाय”

मुंबई | महाविकास अघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. याच मुद्यावरुन भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना प्रत्युतर दिलं.

‘राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील कोणताही नेता सांगत असला तरी भाजपचा एकही आमदार फुटणार नाही’, असा दावा पडळकर यांनी केलाय. तसेच ‘अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु आहे’, असा खोचक टोला पडळकरांनी पवारांना लगावला आहे.

अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. भाजपचं सरकार होतं तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या काळातील अजितदादांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली असल्याचंही पडळकरांनी म्हटलं आहेत.

दरम्यान,  भाजप नेते निलेश राणे आणी भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीसुद्धा अजित पवारांवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ते’ पत्र ट्विट करत शेतकऱ्यांना केलं आवाहन

विकासापेक्षा राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकार मोठा-अशिष शेलार

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्याची आवश्यकता- अशोक चव्हाण

‘शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस…’; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

गोपिचंद पडळकरांचे संजय राऊतांना पत्र; शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमच्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या