अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

Ajit Pawar

Ajit Pawar Health | गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे प्रचाराच्या धामधुमीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात त्यांनी स्वत:हून सर्वाधिक लक्ष घातल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी प्रचारसभांचा त्यांनी सपाटा लावला होता. तसेच साताऱ्यातही त्यांनी सभा घेतली होती. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यांसाठी त्यांनी सभा घेतली होती. यामुळे अजित पवार यांची प्रकृती (Ajit Pawar Health) बिघडली.

अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून प्रचारसभा घेत आहेत. तसेच त्यांनी शिरूरमधून आढळराव पाटील यांच्यासाठी देखील सभा घेतली. तसेच ते दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभांना संबोधित करत होते. प्रचारसभांच्या धावपळीमुळे अजित पवार यांची प्रकृती बिघडली (Ajit Pawar Health) आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोडशो’ला देखील जाता आलं नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

अजित पवार यांच्या घशाला इन्फेक्शन

मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला. यामध्ये महायुतीचे अनेक दिग्गज मंडळी आले होते. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र अजित पवार त्याठिकाणी उपस्थित नसल्याने ते नॉटरिचेबल आहेत का? असा प्रश्न केला जात होता. मात्र अजित पवार यांच्या घशाला इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. (Ajit Pawar Health)

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते उमेश पाटील यांनी याबाबत माहिती सांगितली आहे. अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत त्यांनी माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या घशाला इन्फेक्शन झाल्याचं उमेश पाटील यांनी माहिती सांगितली आहे. अनेकजण अजित पवार हे नॉटरिचेबल असल्याचं बोलत होते त्यावरही त्यांनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले उमेश पाटील?

“अजित पवार यांच्याबाबत विविध बातम्या येत राहतात. ते नॉटरिचेबल नाहीत. ते नाराजही नाहीयेत. त्यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. सध्या ते ठिक आहेत. प्रचारसभेत गेल्यानंतर इतरांना देखील त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. डॉक्टरांचा सल्ला मिळाला की ते उद्या कदाचित प्रचारसभांमध्ये उपस्थित असतील,” असं उमेश पाटील म्हणाले आहेत. (Ajit Pawar Health)

दरम्यान काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या देखील घशाला इन्फेक्शन झाल्याचं समजत होतं. ते बारामती लोकसभा मतदारसंघात सांगता सभेत बोलत होते. तेव्हा त्यांच्या घशातून आवाज फुटत नसल्याचं जाणवलं देखील त्यानंतर एक दिवस त्यांनी विश्रांती घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा लेकीच्या मतदानाला शरद पवार दिसले.

News Title – Ajit Pawar Health Update News

महत्त्वाच्या बातम्या

महिलांनो बाहेर पडताना बॅगमध्ये ‘या’ 5 गोष्टी ठेवाच; अन्यथा होईल मोठी पंचाईत

अधिक मीठ खाणं जीवघेणं ठरतंय, जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

हिरामंडीमधील ओरल सेक्सच्या सीनबाबत शेखर सुमनचा खुलासा!

“…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार?”; बड्या नेत्याने थेट फार्म्युलाच सांगितला

“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .