बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवारांनी कोवॅक्सिन लस निर्मितीचा प्रकल्प राजकीय वजन वापरून पुण्याला पळवला”

नागपूर | भारत बायोटेक या कंपनीच्या कोवॅक्सिन लसीचे उत्पादन सध्या पुण्यामध्ये होत आहे. पण ही कंपनी लस निर्मितीसाठी नागपूरच्या मिहानमध्ये प्रकल्प सुरु करणार होती. पण अजित पवार यांनी राजकीय वजन वापरून हा प्रकल्प पुण्याला पळवला, असा आरोप भाजपतर्फे करण्यात येत आहे.

भाजपचे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी अजित पवारांवर निशाणा साधत मिहानमध्ये भारत बायोटेक कंपनी लसीची निर्मिती करणार होती. पण अजित पवारांनी राजकीय वजन वापरून हा प्रकल्प पुण्याला पळवला असा गंभीर आरोप माध्यमांशी बोलताना केला आहे.

दरम्यान, सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना मिहानमध्ये निमंत्रण देण्यात आलं होतं. पण ऐनवेळी अजित पवारांनी हस्तक्षेप करत भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवून नेला, हा विदर्भावर मोठा अन्याय आहे. असं देखील यावेळी खोपडे यांनी बोलून दाखवलं. त्याबरोबरच नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि इतर काँग्रेस नेते याबाबत मूग गिळून गप्प का आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

भाजप आमदारानी केलेल्या या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेमके कसे उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

कोविशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आरोग्य मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना ‘या’ नव्या आजाराचा धोका, नागपूरमध्ये रुग्ण वाढले

जोर लगाके हैशा! लोकं बघत राहिली पण युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं

नव्या फीचर्ससह शाओमी ‘हा’ लोकप्रिय स्मार्टफोन रिलाँच करणार

 ‘या’ जिल्ह्यात तौक्ते वादळात खलाशी बेपत्ता, घरांचं नुकसान तर गावांचाही संपर्क तुटला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More