Ajit Pawar | महायुतीच्या नेत्यांनी आज राजभवनात जावून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांना पत्र देत सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर या तीनही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठा खुलासा केलाय.
“मी कोणालाही भेटलो नाही”
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मी फक्त एक खुलासा करू इच्छितो. मी माझ्या वेगळ्या काम करिता दिल्लीला गेलो होतो. मी कोणालाही भेटायला गेलेलो नव्हतो.
माझ्या बाबतच्या अनेक बातम्या चालवल्या गेल्या. मी कोणाला भेटायला गेलेलो नव्हतो. त्यामुळे भेट नाकारायचा प्रश्नच येत नाही. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलो होतो, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितलं.
अजित पवारांचा खुलासा
माझी पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर सभासद केलेला आहे. त्यांना 11 जनपद तो बंगला मिळालेला आहे. मला कोणत्याही गव्हर्मेंट घर असू द्या, आमचं स्वतःचं घर असू द्या, मला सगळं नीटनेटकं लागतं. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, म्हणून मी तिथं आर्किटेकला घेऊन गेलो होतो, असा खुलासा अजित पवारांनी (Ajit Pawar) केला.
देवेंद्र फडणवीस, मी आणि एकनाथ शिंदे सर्वजण गेलो होतो तेव्हा भेट झालेली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्ही सर्वजण मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मनापासून प्रयत्न करू. आम्हाला अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा राज्याच्या सर्व समाजाला कसा करून देता येईल याकडे लक्ष देऊ, असंही यावेळी अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही?, फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं
‘मी तर घेणारे शपथ, मी काय थांबणार नाही’; अजित पवारांच्या वक्तव्याने सगळे खळखळून हसले
मोठी बातमी! महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा
पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!
शपथविधीआधी फडणवीसांचा शिंदेंना धक्का?, ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण