बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार- अजित पवार

मुंबई |  राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव अधिक वाढत असल्याचे पाहायला मिळतं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी वक्तव्य केलं आहे.

अकोला, अमरावती आणि यवतमाळ या शहरात लॉकडाऊन लागू शकतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईपेक्षा जास्त रुग्णसंख्या अमरावतीत दिसत असल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरात सध्या काय परिस्थिती आहे. याबाबत आज आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर या तीन जिल्ह्याबाबत काय निर्णय घेतला जाणार हे समोर येईल, असं अजित पावर यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच लॉकडाऊनबाबत अकोला, अमरावती आणि यवतमाळमधील कोरोना रोखण्यासाठी खबरदारी घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, लोक मास्क लावत नाहीत. नियम पाळले नाही तर लॉकडाऊन लागू शकतो आणि निर्बंधही अधिक कठोर करण्यात येतील, असा  इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ देशात फेसबुकने बातम्या वाचण्यावर घातली बंदी!

पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

‘गाडी मेरी टू सीटर, उसमे लगा है एक मीटर’; ढिंचॅक पूजाचं नवीन गाणं रिलीझ, पाहा व्हिडीओ

“तुमच्या सोबत बसणारा मंत्री 11 दिवस झाले गायब आहे, त्याला तरी शोधा”

गजानन मारणे प्रकरणी न्यायालयात हायव्होल्टेज ड्रामा, पाहा नेमकं काय काय झालं!

 

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More