भोसरी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरीतील मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना भलताच राग आला. ते चक्क आपल्याच कार्यकर्त्यांवर संतापलेले पहायला मिळाले.
अजित पवारांचं भाषण सुरु असताना विलास लांडेंचे कार्यकर्ते लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी घोषणाबाजी करत होते. त्यामुळे अजित पवारांचा पारा चढला.
आता बास झाला लाड. मला अजित पवार म्हणतात. आता जर घोषणा दिल्या तर तिकीटच कापेन, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
तिकीट कुणाला द्यायचं याचा निर्णय शरद पवार घेतात आणि तुमचा निरोप त्यांना कळवतो, असंही ते म्हणाले.
दरम्यान, शिरुरमधून लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे प्रकाश आंबेडकरांची नवी मागणी
–मी ‘मन’से राज ठाकरेंसोबतच, नाराज नाही- शरद सोनावणे
–मुख्यमंत्र्यांनी प्रमोद जठारांचा राजीनामा फाडून राजन तेलींच्या खिशात टाकला!
–‘सुजय विखेंना राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्यास राधाकृष्ण विखेंचा हिरवा कंदिल’!
–माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे- अमोल कोल्हे
Comments are closed.