बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांचा मोठा निर्णय, सरकारमध्ये अजितदादांची ‘पावर’ आणखी वाढली

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडलं होतं, मात्र त्यावेळी राजीनामा न दिलेल्या देशमुखांना उच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर मात्र राजीनामा द्यावा लागणार आहे. वसुली प्रकरणी आता सीबीआय देशमुखांची चौकशी करणार असून या निर्णायामुळे मंत्रिमंडळात खांदेपालट झाले असून काहींना याचा फायदा झालेला दिसत आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे, या निर्णयाशिवाय शरद पवार यांनी काही निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे सरकारमध्ये अजित पवार यांची ताकद आणखी वाढली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडील उत्पादन शुल्क या महत्त्वाच्या खात्याचा पदभार अजित पवार यांच्या सोपवण्यात आला आहे, त्यामुळे मंत्रिमंडळात अजित पवार आणखी मजबूत स्थितीत आले आहेत.

अजित पवार यांच्याकडे सध्या अर्थ आणि नियोजन मंत्रिपदाची जबाबदारी आहे. या जोडीला आता त्यांच्याकडे उत्पादन शुल्क खात्याचा कारभार देखील आला आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांचंही मंत्रिमंडळातील वजन वाढलं आहे, कारण वळसे पाटील यांच्याकडील कामगार मंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

राज्य मंत्रिमंडळातील या बदलांबाबतचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलं आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा देखील अधिस्वीकृतीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

DySP व्हायचं स्वप्न अधुरं, पुण्यात शेतकऱ्याच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

मोठी बातमी- फक्त गृहमंत्रीच नव्हे ‘या’ दोन खात्यांचे मंत्रीही बदलणार!

‘या’ नेत्याची गृहमंत्रिपदी नेमणूक करा; मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र

कोरोनाबाधित आईसोबत राहण्यासाठी मुलाचा हंबरडा, जिल्हाधिकाऱ्याचे धरले पाय!

कोब्रा कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात; सहिसलामत सोडण्यासाठी घातली ‘ही’ अट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More