बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवारांनीच अधिकाऱ्यांच्या करिअरवर गाढवाचा नांगर फिरवण्याचं काम केलंय”

मुंबई | पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या मुद्यावरुन राज्यातील तीन चाकी सरकारमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या मुद्यावरुन काँग्रेसच्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यासंबंधितील अध्यादेश मागे घेण्याची मागणी केली होती.  आता याच मुद्यावरुन गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात जातीयवादी पक्ष असल्याचा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच पडळकर यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. आज माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले की, पाच वर्षांच्या पोराला झोपेतून उठवून जरी विचारलं ना तरी तो पोरगा देखील सांगेल की कोणता पक्ष सर्वात जास्त जातीयवादी आहे.

तसेच पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमाती, एससी-एसटी, विशेष मागास प्रवर्गही आहे. यातील ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यांनी या सर्व अधिकाऱ्यांच्या करिअरवर नांगर फिरवण्याचं काम केलंय हे स्पष्टपणे दिसत आहे, असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पडळकर यांनी यावेळी इतरही काही मुद्यांवर भाष्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँंग्रेस काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

निलेश राणे आणि संजय काकडेंनी तब्बल इतक्या लाखांची पाणीपट्टी थकवली, पुणे महापालिकेने धाडली नोटीस

आनंदाची बातमी! अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं

‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल

‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा

“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More