अहमदनगर | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी लिहिलेल्या एका पत्राने आता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात खळबळ माजवली आहे. हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कुकडीचे पाणी कर्जत-जामखेडला देणं शक्य नाही, असं अजित पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांना लिहिलेल्या पत्रात यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.
कर्जत-जामखेडसाठी कुकडीचे पाणी आणायचे आहे, मला आमदार करा, अशी विनंती रोहित पवार सध्या मतदारांना करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपनं हे पत्र व्हायरल करुन रोहित पवार देत असलेलं आश्वासन फोल ठरवलं आहे.
व्हायरल पत्रामुळे कुकडीच्या पाण्याविषयी रोहित पवार देत असलेलं आश्वासन खोटं आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मतदारसंघात यासंदर्भात जोरदार चर्चा रंगली असून या पत्रामुळे रोहित पवार यांना मिळणाऱ्या मतांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
कणकवलीत देवेंद्र-उद्धव आमने सामने; दोघेही घेणार प्रचारसभा! https://t.co/AeIB7T5zXT @uddhavthackeray
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
“महेश लांडगेंनी लोकसभेला मला मदत केली म्हणून आता त्यांना निवडून आणणारच!” https://t.co/j5h3gxQJp0 @MLAMaheshLandge @MPShivajirao
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
आदित्य ठाकरेंचा उदयनराजेंना वाकून नमस्कार; राजेंनी दिलं अलिंगन https://t.co/nctMXmG8dU @AUThackeray
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
Comments are closed.