जयंत पाटील अजितदादांना लवकरच धक्का देणार? नेमकं काय होणार

Ajit Pawar

Ajit Pawar l महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राज्यातील सर्वच राजकीय वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप केली नाही. मात्र येत्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना लवकरच धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना धक्का बसणार? :

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील सईताई डहाके यांची भेट घेतल्याचे चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली आहे.

दिवंगत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी कारंजा बाजार समितीच्या सभापती आहेत. तसेच मंत्री दिलीप वळसे पाटील आणि डहाके परिवाराचे जावई देखील आहेत. मात्र त्या सध्या राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटात आहेत. मात्र आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सईताई डहाके यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Ajit Pawar l डहाके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळणार? :

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला धक्का बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण प्रकाश डहाके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र डहाके कुटुंबाला उमेदवारी अजित पवार गटाकडून मिळणार कि शरद पवार गटाकडून मिळणार यावर तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दिवंगत प्रकाश डहाके हे सतत कारंजा मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटले आहेत. त्यांची 1995 मध्ये कारंजा मतदारसंघाची राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून निवडणुक देखील लढविली होती. मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यांनी तो पराभव स्वीकारून 1999, 2004 मध्ये विधानसभेची निवडणुक लढविली. मात्र, या दोन्ही निवडणुकीत त्यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच त्यानंतर त्यांनी 2004 मध्ये निवडणूक लढवली मात्र त्यावेळी ते केवळ 47 मतांनी पराभुत झाले. यानंतर त्यांनी 2009 मध्ये निवडणूक लढवली आणि कारंजा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 30 हजार 307 मताधिक्याने त्यांनी विजय मिळविला आहे.

News Title : Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha Election 2024

महत्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार!

मृत्यूच्या खोट्या अफवांवर भडकला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी जीवंत आहे”

ग्राहक आनंदी! सोनं झालं स्वस्त, रक्षाबंधनानंतर ‘इतके’ घसरले भाव

…तर सीमकार्ड होणार ब्लॅकलिस्ट; सप्टेंबरपासून TRAI आणणार नवा नियम

खुशखबर! राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा होणार पोलीस भरती, एकूण पदे किती?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .