Top News पुणे राजकारण

पार्थला फटकारल्यानंतर अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे | पार्थ पवारांच्या मागणीला कवडीची किंमत नाही. ते अपरिपक्व आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाचार घेतला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीने शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले असल्याची माहिती मिळालीये.

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर पार्थ यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली या प्रकरणाचा तपास सीबीआयतर्फे व्हावा अशी मागणी करीत निवेदन दिलं होतं. त्यानंतरही त्यांनी पक्षाशी विसंगत अशाच भूमिका घेतल्या आहेत. शिवा. अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पार्थ यांनी ट्विट करत मंदिराला पाठिंबा दिला होता. तसंच हा दिवस एैतिहासिक असल्याचं म्हटलं होतं.

“पार्थ यांनी घेतलेल्या भूमिकेचा शरद पवार यांनी आज समाचार घेतला. पार्थ हे अपरिपक्व आहेत. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही. सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेला तपास योग्यच आहे. मुंबई पोलिसांवर आपला विश्वास असल्याचंही,” शरद पवार यांनी म्हटलंय.

शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारल्यानंतर पार्थ यांनीही कोणतंही विधान करण्यास नकार दिला. मात्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी पार्थ यांची बाजू घेतली आहे. ‘पार्थ हे लंबी रेसका घोडा है’ असं सांगत त्यांना थांबू नकोस मित्रा असा सल्लाही दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या कडवट टीकेवर पार्थ पवार यांची अतिशय सायलेंट प्रतिक्रिया…!

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात दीड हजारांहून जास्त रुग्ण आढळले!

काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या