Top News पुणे महाराष्ट्र

कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली गेली पाहिजेत; अजितदादांच्या प्रशासनाला सूचना

पुणे | शुक्रवारी पुण्यात विधान भवनात कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. कोरोना’च्या संकटाबाबत भविष्यातील धोका ओळखून नियोजन करा व सर्व यंत्रणांनी समन्वय राखून कर्तव्य बजावा, अशी प्रमुख सूचना अजित पवार यांनी दिली.

कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं,हे आज आपल्या पुढील सर्वात मोठं आव्हान आहे. शासन, प्रशासन, विविध यंत्रणा अनेक आघाड्यांवर लढत आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणं आवश्यक असल्याचं अजित पवार म्हणाले.

लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या सीमेबाहेरून कुणी व्यक्ती येत असल्यास काटेकोरपणे तपासणी, संस्थात्मक विलगीकरण या गोष्टी पाळल्या गेल्याच पाहिजेत. बाहेरून येऊन कुणामार्फत संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, असं अजित पवार म्हणाले.

बाहेरून येणाऱ्या बाधित व्यक्तींमध्ये अनेकदा ‘कोरोना’ची लक्षणं दिसत नाहीत. परंतु त्यांच्या मार्फत संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्याबाबत काटेकोर कार्यवाही व्हावी. आवश्यक तिथे इतर यंत्रणांचे सहकार्य घ्यावे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून काम करावं, अशा सूचना अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे 2940 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले

महत्वाच्या बातम्या-

संकटात सापडलेल्या राज्याला सावरायचं सोडून आंदोलन करून दुहीची बिजं पेरली; आव्हाडांची टीका

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; 4-5 वर्षांपासून…

महाराष्ट्रातला मृत्यूदर गुजरात मध्य प्रदेशपेक्षा कमी, मात्र संसर्गाचा दर अधिक…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या