सर्वात मोठी बातमी! अजित पवार शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीत मोठी खलबतं?

Ajit Pawar statement

Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आज (12 डिसेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार पहिल्यांदाच असं समोरासमोर भेटले आहेत. राजकीय मैदानात एकमेकांवर टीकेची तोफ डागणारे काका-पुतणे यांचे कौटुंबिक संबंध अजूनही प्रेमळ आणि जिव्हाळ्याचे असल्याचे यातून दिसून येत आहे. (Ajit Pawar)

आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल देखील उपस्थित आहेत.

अजित पवार-शरद पवार भेट

शरद पवार यांचा आज 12 डिसेंबररोजी 85 वा वाढदिवस आहे. आज दिल्लीत त्यांची भेट घेण्यासाठी अनेक नेते पोहोचले आहेत. राजकीय वर्तुळातून अनेक दिग्गजांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशात स्वतः अजित पवार देखील सहकुटुंब दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

राष्ट्रवादीच्या फूटीनंतर अजित पवार आणि शरद पवार हे पहिल्यांदाच असं भेटले असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या उतारवयात अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना मोठा राजकीय धक्का देत भाजपशी हातमिळवणी केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 उमेदवार निवडून आणले.

शरद पवार यांचा आज वाढदिवस

तर, दुसरीकडे शरद पवार यांना केवळ 10 जागांवर यश मिळाले. शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय करिअरमध्ये हा त्यांना बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जातोय. आज शरद पवार यांच्या वाढदिवशी राजकीय कटुता दूर सारून अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. राजकारणात याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. (Ajit Pawar)

आज सकाळीच अजित पवार यांनी शरद पवारांच्या वाढदिवशी एक पोस्ट देखील केली होती. “आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.”, असं अजित पवारांनी काका शरद पवार यांचा फोटो शेअर करताना म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट तूफान व्हायरल झाली आहे. यावर अनेक प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांकडून नोंदवल्या जात आहेत.

News Title –  Ajit Pawar meets Sharad Pawar today  

महत्त्वाच्या बातम्या-

काका शरद पवारांना अजितदादांकडून वाढदिवशी खास शुभेच्छा; म्हणाले…

सत्तेची गणितं फिरली तशी सोन्यानेही रंग बदलले; गेल्या 5 वर्षांत ‘असे’ वाढले भाव

कुणाला संधी तर कुणाचा पत्ता कट?, फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख ठरली

महालक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, सर्व मनोकामना पूर्ण होणार!

सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं, इतक्या लाखांची दिली सुपारी

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .