Loading...

पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपसोबत चला; अजितदादांचा शरद पवारांना संदेश

मुंबई | पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपसोबत चला, असा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांना पाठवला आहे. त्यामुळे अजित पवार यांचं बंड अजूनही शमलेलं नाही, असं चित्र समोर येतंय.

अजित पवार यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सध्या राष्ट्रवादीकडून सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले आहेत.

Loading...

अजित पवार यांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न फोल ठरले आहेत. उलट अजित पवार यांनीच राष्ट्रवादीला निरोप पाठवला आहे.

अजित पवार पुन्हा माघारी फिरण्यास तयार नसल्यानं राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता धनंजय मुंडेंही राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचल्यानं ते काय संदेश घेऊन आलेत?, याची चर्चा आता नव्याने सुरु झाले आहेत.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...