आताची सर्वात मोठी बातमी; अजित पवारांनी घेतली फडणवीसांची भेट

मुंबई | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर जाणार असल्याचं ट्वीट केलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानंतर राज्यात एक मोठी घडामोड घडली आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात खलबतं झाल्याची माहिती आहे. यामुळे आता अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

अजित पवार गेल्या आठवड्यात अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर आले आणि पित्ताचा त्रास असल्याने कार्यक्रम रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, काही मुद्द्यांवर अजित पवारांनी मविआच्या विरोधात भूमिका मांडली. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. अशात अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा महाराष्ट्र रंगू लागल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-