अजित पवार गटाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला; थेट..

Ajit Pawar NCP | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकही जागा देण्यात आली नाही.त्यातच आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार यांना सोबत घेतल्याने निवडणुकीत फटका बसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे अजित पवार गटात नाराजी असल्याचं म्हटलं जातंय.

अजित पवार गटाला नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची (स्वतंत्र प्रभार) ऑफर देण्यात आली होती. यासाठी राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल यांची निवडही झाली होती. पण, यापूर्वी कॅबिनेट पदी काम केल्यानंतर राज्यमंत्री पद काम करणे जमणार नसल्याचं पटेल यांनी सांगितलं.

भाजप अजित पवारांची नाराजी दूर करणार?

केवळ राज्यमंत्री पदावर बोळवण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे लक्षात येताच, ज्येष्ठतेचे कारण देत अजित पवार गटाने याची ऑफर नाकारली. आता भाजपने ही नाराजी मिटवण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याचं कळंतय. प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला आहे.

त्यानंतर एक जागा भाजप कोट्यातून देणार (Ajit Pawar NCP) असल्याची मागे चर्चा होती. भाजप कोट्यातून राष्ट्रवादीचा एक नेता राज्यसभेवर पाठविण्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.आता पटेल यांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला आहे. मग, या दुसऱ्या जागेसाठी कुणाला संधी मिळणार, याबाबत सर्वांचं लक्ष लागून आहे.

अजित पवार गटाचे दोन नेते राज्यसभेत जाणार?

राज्यात भाजपच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. यातीलच एक जागा अजित पवार गटाला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पीयूष गोयल लोकसभेमध्ये गेल्याने त्यांच्या रिक्त जागेविषयी ही शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः अजित पवार यांनी देखील आमचे दोन नेते राज्यसभेत जातील (Ajit Pawar NCP) असं म्हटलं होतं.

त्यामुळे अजित पवार गटाकडून आता कुणाला संधी दिली जाणार, त्याबाबत सस्पेन्स तयार झाला आहे. राजकीय वर्तुळात सध्या नाराज नेत्याला इथे संधी दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय आणि राष्ट्रवादी गटात सध्या छगन भुजबळ नाराज असल्याचे म्हटलं जातंय. पण, भुजबळ यांनी नाराजी नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे दुसरे नाव कोणाचे राहणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

News Title-  Ajit Pawar NCP Getting Big Offer From Modi Government

महत्त्वाच्या बातम्या-

“SIT खरंच रद्द केली की शेंगा हाणल्या..”; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जरांगे पाटलांचा टोला

“…ताई आज अचानक हिंदू कशी झाली?”, केतकी चितळेच्या वक्तव्याचा किरण मानेंनी घेतला समाचार

अजित पवार ‘या’ घोटाळ्यामुळे पुन्हा अडचणीत सापडणार?

शेतकऱ्यांनो यापुढे कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरविणार, शेतकऱ्यांचा फायदा की तोटा?

राज्यातील पावसासंदर्भात हवामान विभागाने वर्तवला महत्वाचा अंदाज!