अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार?; ‘त्या’ नेत्यांची पुन्हा शरद पवारांकडे वाटचाल?

Ajit Pawar NCP | लोकसभा निवडणूक पार पडली. नवीन सरकार देखील स्थापन झालं. मात्र राज्याच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा वाढता आलेख दिसून आला आहे. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यांना लोकसभा निवडणुकीत म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. त्यांना केवळ रायगडची जागा जिंकता आली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं टेन्शन वाढलं आहे. (Ajit Pawar NCP)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 39 पदाधिकारी शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. येत्या 20 तारखेला हा पक्षप्रवेश करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हा अजित पवार गटाला मोठा धक्का असू शकतो.  (Ajit Pawar NCP)

अजित पवारांना मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा करिश्मा चालला नाही. लोकसभा निवडणुकीत रायगड या एकाच जागेवर अजित पवारांना विजय मिळवता आला आहे. यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं अवघड होऊन बसलं आहे. कारण पिंपरी चिंचवड येथील अजित पवार गटातील काही पदाधिकारी हे शरद पवार गटात पक्षप्रवेश करतील. यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) कमकुवत होऊन शरद पवारांचा पक्ष कणखर होईल अशी शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी असलेले अजित पवार गटातील पदाधिकारी हे पक्षातील उभी फूट पडण्याआधी अजित पवारांसोबतच होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांची साथ सोडली होती. मात्र आता अजित पवारांच्या कामगिरीवर ते खूश नसल्याचं दिसत आहेत. त्यामुळे आता ते शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. याचा अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे.

पक्षात पुन्हा येणाऱ्यांबाबत शरद पवार म्हणाले…

मागच्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड येथील काही नेते हे शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सध्या शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. यावेळी पक्षातून बाहेर गेलेल्यांना परत पक्षात घेणार का? असा प्रश्न त्यांना  विचारण्यात आला आहे. त्यावर पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षात पुन्हा येण्याबाबत मला कोणीही भेटलं नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

News Title – Ajit Pawar NCP Leader Will Enter In Sharad Pawar NCP Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील ‘या’ खेळाडूला मिळणार घर आणि सरकारी नोकरी!

स्क्रीनसमोर जास्त वेळ बसल्याने डोळ्यांची जळजळ होतेय?, ‘या’ उपयांनी मिळेल आराम

“तात्यांचं शेवटचं स्टेशन हे मातोश्री..”; वसंत मोरेंच्या पक्ष प्रवेशावर संजय राऊतांचं वक्तव्य

सोन्याने घेतली पुन्हा भरारी, काय आहेत आजचे दर?

वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर; मुख्य आरोपीला पोलिसांनी..