महायुतीत अजित पवारांना एकटं पाडण्याचा डाव?, नाशकात शिंदेंच्या सेनेला झुकतं माप

Ajit Pawar NCP | नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. येथे भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. अजित पवार यांना महायुतीमध्ये पुन्हा एकटं पाडण्याचा डाव आहे की काय?, अशा चर्चा आता रंगत आहेत.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी कांग्रेसचे महेंद्र भावसार हे उमेदवार आहेत. मात्र, भाजपकडून शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे राजकारणात सध्या वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. अजून विधानसभा निवडणुका होणे बाकी आहे, त्यापूर्वीच महायुतीमधील अंतर्गत वाद आता समोर येत आहेत.

नाशिकच्या उमेदवारीवरून संभ्रम

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडूनही महायुतीचे उमेदवार किशोर दराडे असतील अशी घोषणा करण्यात आली आहे. तर त्यांचे प्रभारी गिरीश महाजन आणि सह-प्रभारी विजय चौधरी असतील असं भाजपने म्हटलं आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही या जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे. भावसार हे आमचे उमेदवार असल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. तर, दुसरीकडे आमदार माणिकराव कोकाटे यांनी तर ‘कोण भावसार?’ असा प्रश्न केलाय. इतकंच नाही तर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तर थेट (Ajit Pawar NCP) मविआ उमेदवार संदीप गुळवे यांनाच पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?

या सर्व घडामोडींमुळे नाशिकच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झालाच आहे, शिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय?, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. शिंदे सेनेचे किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी महायुतीकडून बैठकही झाली. मात्र, या बैठकीत अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी दांडी मारली होती.

त्यामुळे महायुतीमध्ये या जागेवरून तिढा निर्माण झाल्याचं म्हटलं जातंय. मंत्री भुजबळ यांनी आमच्या पक्षाकडून महेंद्र भावसार उमेदवार असल्याचं म्हटलंय. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, पुढे कसे होते ते बघू, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे इथे सध्या तरी उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला (Ajit Pawar NCP) आहे.

News Title –  Ajit Pawar NCP Nashik Teachers Constituency Seat

महत्त्वाच्या बातम्या-

“मोदींहून सुप्रिया सुळेंना अधिक लीड”; पवारांनी मोदींना डिवचलं

केंद्र सरकार पंकजा मुंडे संदर्भात ‘हा’ मोठा निर्णय घेणार!

पावसाळ्यात होणाऱ्या केसगळतीमुळे त्रस्त आहात?; करा ‘हा’ उपाय

अदिती तटकरे होणार ‘या’ जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री

विधानसभेपुर्वी शिंदे सरकार महिलांना देणार मोठं गिफ्ट?, थेट बँक खात्यावर पैसे..