Ajit Pawar | राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रमुख अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. अजितदादा (Ajit Pawar) यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न यंदाही अपूर्णच राहिलं आहे. त्यांची यावेळीही उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे. अजित पवार यांनी एक अजब रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. सध्या याची देखील राजकारणात चर्चा रंगते आहे.
बारामतीचे आठ वेळा निवडून आलेले आमदार आणि एक कुशल प्रशासक म्हणून प्रचलित असलेले अजित पवार यांनी राजकारणाचे धडे काका शरद पवार यांच्याकडून घेतले. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकारण शिकले. 2010 मध्ये त्यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 2012 मध्ये पुन्हा ते उपमुख्यमंत्री बनले. यानंतर चारवेळा ते उपमुख्यमंत्री राहिले आहेत.
सहावेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा रेकॉर्ड
अजित पवार हे एकूण सहावेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांनी केलेला हा एक नवा विक्रमच म्हणावा लागेल. 2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर आर. आर. पाटील यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपदावर नियुक्त नियुक्त करण्यात आलं. भुजबळ यांच्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले.
कॉँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी पहिल्यांदा 2010 मध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2012 पर्यंत ते उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर 2012 ते 26 सप्टेंबर 2014 मध्येही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पदाखाली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
आज पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
यानंतर 2019 मध्ये अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी पहाटे शपथ घेतली होती. मात्र, हे सरकार काही तासांतच कोसळले. हे सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यावेळी देखील अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. 29 जून 2023 पर्यंत ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.
यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना पक्ष फुटला. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली. यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे राज्याचे विरोधीपक्षनेते बनले. मात्र, काही महिन्यांतच राष्ट्रवादी कॉँग्रेस देखील फुटली. अजित पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी केली. 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिले. आता आज 5 डिसेंबर 2024 रोजी अजित पवार पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यांनी इतक्या वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा हा नवा रेकॉर्ड केलाय.
News Title : Ajit Pawar new record of becoming Deputy CM
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार?; ‘या’ बड्या नेत्याने सस्पेन्स संपवला
शपथविधीपूर्वी फडणवीसांचा शरद पवारांना फोन, चर्चेला उधाण
‘या’ तारखेला होणार 33 मंत्र्याचा शपथविधी, कोणाला किती मंत्रिपदं मिळणार?
मोठी बातमी! गृहखात्याच्या बदल्यात शिवसेनेला ‘हे’ महत्त्वाचं खातं मिळणार
‘मैं समंदर हूं, लौटकर आऊंगा…’, तरुण महापौर ते मुख्यमंत्री; फडणवीसांचा थक्क करणारा प्रवास