Ajit Pawar | महाविकास आघाडीने नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 30 जागांवर राज्यात विजय मिळवला. दुसरीकडे महायुतीने केवळ 17 जागांवर विजय मिळवला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आता भाजपसाठी डोके दुखी ठरले आहेत. अजितदादांमुळेच भाजपचा पराभव झाल्याचा नाराजीचा सूर हा भाजप आमदारांकडून येत आहे. यामुळे आता अजितदादा हे भाजपला जड जात आहेत, असं म्हटलं तरी ही वावगं ठरणार नाही.
भाजपच्या आमदारांना अजित पवारांचं ओझं :
भाजपच्या आमदारांना अजित पवार (Ajit Pawar) हे ओझे होत असल्याचं बोललं जात आहे. कारण अजितदादा सत्तेत आहेत. मात्र त्यांच्यामुळे एकही जागा निवडून न आल्याने भाजप आमदारांमध्ये नाराजूचा सूर आहे. यामुळे आता अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये नकोसे झाले आहेत. असं उघड कोणीही बोललं नाही. मात्र आता एका आरएसएसच्या मुखपत्रातून महायुतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाला सहभागी करून घेतल्याप्रकरणी कान उपटण्यात आले आहेत.
अजित पवार सत्तेत असून अजित पवारांची मते भाजपला मिळाली नसल्याचा दावा भाजप आमदारांनी केला आहे. त्यासाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघाची यादीच बाहेर काढली. यामध्ये सोलापूर, माढा, दिंडोरी, मावळ आणि शिरूरसारख्या मतदारसंघातून भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना फटका बसला असल्याचं दिसून आलं आहे.
अजित पवारांच्या आमदारांच्या मतदारसंघातही हीच परिस्थिती निर्माण झाली. अजित पवारांच्या मतदारसंघातही विरोधकांनाच मते गेली असल्याचा दावा भाजप आमदार करत आहेत. इतर मतदारसंघातही अजित पवारांचे कार्यकर्ते आणि नेते सक्रिय नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
अजितदादांना ठेवायचं की नाही यावर पुनर्विचार
शिरूर मधील खेड विधानसभा मतदारसंघात आंबेगाव दीलिप वळसे पाटील, जुन्नर – अतुल बनके, दिलीप मोहिते पाटील आणि हडपसरमध्ये चेतन तुपे हे चारही आमदार असताना शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार सत्तेत असूनही कोणतेही मत हे भाजपला मिळालं नाही. ते महायुतीच्या उमेदवाराला मिळालं नाही. यामुळे आता भाजप आमदारांनी अजित पवारांना सोबत ठेवायचं की नाही याचा पुनर्विचार करावा अशी मागणीने जोर धरला आहे.
News Title – Ajit Pawar No Needful For Mahayuti In Loksabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या
ओबीसी आरक्षणावर गोपीचंद पडळकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मॉन्सूनची गती मंदावली, महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा?; IMD कडून महत्वाची अपडेट
“शिंदेंना शह देण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं”; बच्चू कडूंचा भाजपवर खळबळजनक आरोप
टीम इंडियाला नवीन हेड कोच मिळणार? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
‘बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला…’, या खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप