मुंबई | मी 1990 पासून विधीमंडळात आहे, मात्र मुंबई पालिका मुख्यालयात येण्याचा योग कधी आला नाही. शेवटी लेकाने पालिका मुख्यालयात आणलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं.
मुंबई महापालिका व महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ यांच्याकडून पालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरु करण्यात आला आहे. याप्रसंगी अजित पवार बोलत होते. हेरिटेज वॉकला मराठी नाव शोधावं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदिती तटकरे, महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इक्बाल चहल यावेळी उपस्थित होते.
सव्वाशे वर्षानंतरही भक्कम असलेली महापालिकेची वस्तू, किल्ले अशा पुरातन वस्तूंचा वारसा मुंबईला लाभला आहे. तो जपण्याची व पुढे नेण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘हा’ राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद, तो संपवावाच लागेल- संजय राऊत
“कृषी कायदे परत घेतले नाही, तर मी आत्महत्या करेन”
आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही- देवेंद्र फडणवीस
भाजप नेत्याचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ
“देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत त्यांनी आता सुदर्शन काढावं”