Top News राजकारण

‘आम्ही स्वप्न बघत नाही, थेट कृती करतो’; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नांच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय.

अजित पवार म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांना कोणी सांगितलं की, आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडली? मुळात आम्ही स्वप्नं पाहण्याचं काम करत नाही, आम्ही थेट कृती करणारी माणसं आहोत.”

विरोधी पक्षाला सतत हे सरकार पडणार आहे असं म्हणावं लागतं. पक्षाचे कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी तसंच आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये यासाठी अशा प्रकारचं सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं, असा टोलाही पवारांनी लगावलाय.

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केली असून त्यांचे आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत आणि तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही हे मी स्पष्टपणे सांगू शकतो, असंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

ईडीच्या लोकांनी घरी छान नाश्ता, जेवण केलं….; प्रताप सरनाईकांचा खुलासा

अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीने मार्गदर्शक गमावला- मुख्यमंत्री

अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात

फाशी दिली तरी स्विकारणार मात्र, ईडीच्या धाडीमुळे तोंड बंद करणार नाही- प्रताप सरनाईक

दुकानात विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या