बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बैठक भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची, चर्चा मात्र अजित पवारांची!

मुंबई | राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारविरोधात आणखी आक्रमकपणे भूमिका मांडण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तर येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ठाकरे सरकारविरूद्ध आक्रमक पवित्रा घेत काही मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांची सीबीआय चौकशी करावी, असा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता अजित पवारांना टार्गेट केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजप नेते किरीट सोम्मया यांनी वारंवार अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ शकते. तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप पुर्ण तयारीनिशी येत्या 5 आणि 6 जुलैला मैदानात उतरणार आहे.

दरम्यान, यंदाही भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक ऑनलाईन पद्धतीनं असणार आहे. या बैठकीला राज्यभरातून जवळपास चौदाशे कार्यकर्ते हजेरी लावतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

नाना पटोले तातडीने दिल्ली दरबारी, ‘स्वबळाची भाषा’ कारण?

‘लस न घेतलेल्या आमदारांना विधानसभेत प्रवेश नाही’; बिहार विधानसभा अध्यक्षांचं फर्मान

‘लशींसाठी मोदींचे जाहीर आभार माना’; युजीसीची महाविद्यालयांना अजब सूचना

‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे तिसरी लाट येणार का?; तज्ज्ञ म्हणतात…

आंबिल ओढा परिसरातील नागरिक आणि पोलीसांमध्ये तुफान राडा; नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More