फडणवीस, तुम्हाला फेडावे लागेल; अजित पवार यांचा इशारा

कराड | नाभिक समाजाची थट्टा करताय. फडणवीस, तुम्हाला फेडावे लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. प्रीतिसंगमावर यशवंतरावांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. 

पाटसमध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लेखी दिलगिरी व्यक्त केली होती. तसेच काल पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी माफी मागितली.