पुणे महाराष्ट्र

कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा- अजित पवार

पुणे | कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना अनेक निर्देश दिले आहेत.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळायचा आणि दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करुन अर्थचक्राला गती आणायची, हे आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी, असं अजित पवार म्हणाले आहेत.

नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अनेकदा काही ठिकाणी नागरिकांचा बेशिस्तपणा दिसतो. त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाई नियमितपणे करावे, असा आदेश अजित पवारांनी दिलाय.

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ बड्या नेत्याने ट्विटरवरून भाजप हटवले, पक्षामध्ये एकच खळबळ

येत्या ४८ तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

महत्वाच्या बातम्या-

केरळच्या हत्तीणीच्या पोस्टमाॅर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आलंय मृत्यूचं कारण?

“… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच”

रायगड जिल्ह्याला 100 कोटी रुपये मदत तोकडी ठरेल- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या