उन्हाळी पर्यटनाला गेल्याने अजित पवारांची दानवेंवर प्रतिक्रिया नाही

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सगळ्यांचं लक्ष अजित पवार यांच्या प्रतिक्रियेकडे होतं. मात्र अजित पवार यांची प्रतिक्रियाच न आल्यामुळे सगळेच अचंबित झाले होते. दरम्यान, अजित पवार केरळला उन्हाळी पर्यटनासाठी गेल्याची माहिती आहे. 

अजित पवार ९ मेपासून केरळला आहेत, १५ मे रोजी ते संघर्षयात्रेसाठी परतणार आहेत. त्यामुळे आल्यावर ते दानवेंच्या वक्तव्यावर काय बोलतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या