Top News आरोग्य कोरोना

#DoctorsDay- ‘कोरोनासारख्या संकटाविरूद्ध लढणाऱ्या डॉक्टरांना सलाम’

मुंबई | 1 जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. सध्या देशावर कोरोनाचं संकट आहे. आणि देशातील डॉक्टर्स या संकटाचा ध्यैर्याने सामना करतायत. सध्याच्या परिस्थितीत डॉक्टरांचं शौर्य पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त करत राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात.

“‘रुग्णसेवे’च्या माध्यमातून मानवतेची सेवा करणारे डॉक्टर समाजासाठी नेहमीच आदरणीय आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या फळीतील योद्धे म्हणून ते लढत असताना त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढला आहे. कोरोना संकटात डॉक्टर बांधवांकडून होत असलेली मानवसेवा इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली जाईल, त्यांचं स्थान आपल्या हृदयात कायम राहील.”

“‘कोरोना’च्या संकटाविरुद्ध जगभरातील डॉक्टर जोखीम पत्करुन एकजुटीने लढत आहेत. जगभरातील डॉक्टरांची एकजूट, ज्ञानाच्या, अनुभवाच्या आदानप्रदानाने हा लढा आपण नक्की जिंकू” असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय.

“जगभरातील डॉक्टर आज कोरोनाच्या संकटाविरुद्ध ज्या जिद्दीने, ज्या भावनेने लढत आहेत त्याला सलाम आहे. डॉक्टरांच्या सेवाकार्याबद्दल आपण सदैव त्यांचे ऋणी आहोत,” अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला द्यावा; आणखी एका काँग्रेस नेत्याचा शरद पवारांना टोला

महत्वाच्या बातम्या-

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, भुजबळांच्या पाठपुराव्याला यश

नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार

सुशांतच्या आत्महत्येनंतर स्वरा भास्कर मोठं वक्तव्य, म्हणते…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या