बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांना झाली ‘त्या’ शपथविधीची आठवण; म्हणाले…

नाशिक | राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिंडोरीतील कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी अजित पवारांनी नोव्हेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीसांच्या साथीने सकाळी सात वाजता घेतलेल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथ सोहळ्याची आठवण काढली.

मी इतक्या सकाळी लवकर येईल का?, अशी चर्चा होती मात्र एक जण बोलला की हा बाबा सकाळी शपथ घेत असतो, असं म्हणत अजित पवार यांनी थंडीत सकाळी हास्याचे कारंजे उडवले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी सकाळी लवकर भूमिपूजन सोहळ्याला उपस्थिती लावल्याने आयोजकांची थोड्यावेळापुर्ती तारांबळ उडाली.

मराठी आपली मातृभाषा आहे. त्यामुळे मराठीत लिहिता-वाचता आलं पाहिजे, अशी ताकीदच अजित पवारांनी दिली. त्याचवेळी थोडं सबुरीने घ्या, घडी व्यवस्थित बसू द्या, अशी विनंती महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्यांना अजितदादांनी दिली.

दरम्यान, विधानसभेचा निकाल लागल्यावर महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच होता. यादरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागलेली. त्यानंतर मात्र अनपेक्षिपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार स्थापन केलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या- 

कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले चहा

मुस्लिमांशी खेळाल तर मोदींना पुन्हा चहा विकावा लागेल- इम्तियाज जलील

महत्वाच्या बातम्या- 

सीएए हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल- उर्मिला मातोंडकर

मुबारक हो टुकडे टुकडे भाजप– अनुराग कश्यप

कलह पसरवणाऱ्यांना समाजच सरळ करेल- मोहन भागवत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More