खडसेंनी कानात जे सांगितलं, ते योग्यवेळी जाहीर करेन!

जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माझ्या कानात जे सांगितलं, ते मी योग्य वेळ आल्यावर जाहीर करेन, असं अजित पवार यांनी म्हटलंय. ते जळगावात बोलत होते. 

राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात माझ्या मनातील मी अजितदादांच्या कानात सांगितल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्याचा धागा पकडून अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं. 

खडसेंनी जे सांगितलं ते मी आत्ताच सांगणार नाही, कारण भाजप नेत्यांना किमान रात्रभर तरी झोप यायला नको, असंही अजित पवार म्हणाले.