कुठं झाली कर्जमाफी? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नागपूर | राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे, मात्र या हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीवरुन चांगलंच वातावरण तापलंय. 

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी शांताराम कटके यांच्या जाहिरातीचा दाखला देत सरकारवर टीकास्त्र सोडलं. जाहिरातबाजीवर एवढा मोठा खर्च केला जातोय, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा नाही, असं म्हणत कुठं झालीय कर्जमाफी? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. 

दरम्यान, कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख वेगवेगळी वक्तव्य करत असल्याचंही त्यांनी यावेळी निदर्शनात आणून दिलं. 

Google+ Linkedin